एकीकडे देशासह जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली असताना देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे.
ही किंचित घट दिलासादायक बाब असली तरी, कोरोनाचा धोका काही कमी झालेला नाही.
देशात 2119 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सणासुदीच्या काळात कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका घोघांवत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनंही नव्या व्हेरियंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान देशातील कोरोना रुग्ण घटणे यासह दुसरी दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे.
गेल्या 24 तासांत 2,582 कोरोना रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत.
देशात एकूण 4 कोटी 40 लाख 84 हजार 646 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.
देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत देशात कोरोनामुळे पाच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण 5 लाख 28 हजार 953 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.