देशात कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटचा वेगाने प्रसार होत आहे. यादरम्यान दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या सात अंकांनी किंचित घटली आहे. पण कोरोनाचा धोका कमी झालेला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेनं ही नव्या व्हेरियंट बाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
आरोग्य तज्ज्ञांकडून गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
देशात 2112 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
काल देशात 2119 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिलासादायक बाब म्हणजे सक्रीय रुग्णांची संख्याही घटली आहे.
मागील 24 तासांत म्हणजेच शुक्रवारी दिवसभरात देशात दोन हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.
आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 5 लाख 28 हजार 957 वर पोहोचली.
देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 24 हजारांवर आहे.
सध्या देशात 24,043 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत देशात 3 हजार 102 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.
नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे.