भारतात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या किंचित वाढली आहे.



देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच बुधवारी दिवसभरात 6 हजार 395 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.



मंगळवारी 5,379 कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे तुलनेनं 1,016 रुग्णांची वाढ झाली आहे.



सणासुदीच्या काळात वाढती रुग्णसंख्या ही चिंतेचं कारण आहे.



दरम्यान बुधवारी दिवसभरात सहा हजार हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.



गेल्या 24 तासांत देशात 6 हजार 614 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.



दिवसभरात आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे, ही एक दिलासादायक बाब आहे.



देशातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्यी देखील कमी झाली आहे.



सध्या देशात 50 हजार 342 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यामधील बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणं असलेले आहेत.



देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.11 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.7 टक्के आहे.