काँग्रेसच्या (Conress) 'भारत जोडो यात्रे'च्या प्रारंभापूर्वी पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरवर एक भावनिक नोट शेअर केली.



भारत जोडो यात्रेचा शुभारंभ होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी श्रीपेरुंबदूर येथे त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मारकाला भेट दिली.



श्रीपेरंबुदुर हे तेच ठिकाण आहे जिथे राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ एलम दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला



राहुल गांधींनी स्वत:चे छायाचित्र ट्विट करत म्हटले आहे की, द्वेष आणि फाळणीच्या राजकारणात मी माझे वडील गमावले.



मी माझा प्रिय देशही गमावणार नाही. प्रेमाचा द्वेषावर विजय होईल. आपण सर्व मिळून जिंकू असे राहुल गांधी म्हणाले.



वडिलांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर राहुल गांधी महात्मा गांधी मंडप येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कन्याकुमारीकडे रवाना झाले.



काँग्रेसने म्हटलंय की, देशातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय मोर्चा आहे.



या यात्रेला आज सायंकाळी 5 वाजता एका समारंभात सुरुवात होणार असून, कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3500 किलोमीटरची पायी यात्रा उद्या सकाळी सुरू होणार आहे



हा प्रवास सुमारे 150 दिवस चालणार आहे.



मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या यात्रेच्या शुभारंभाकरिता आज राष्ट्रध्वज सुपूर्द करणार आहेत.