देशातील कोरोनाचा आलेख किंचित घटला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 756 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
कालच्या तुलतेन आज देशात 41 रुग्णांची संख्या घटली आहे. तर सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट कायम आहे.
देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 393 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. चांगली बाब म्हणजे नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 756 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी देशात 2 हजार 797 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 40 लाख 54 हजारा 621 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे.
यामध्ये सर्वात मोठी भूमिका लसीकरणाने बजावली आहे. देशात आजपर्यंत 218 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीमुळे कोरोना विषाणूला पूर्णपणे थोपवता आलं नसलं तरी कोरोना संसर्गाचा वेग मंदावण्यात मदत झाली आहे.
देशात गेल्या 24 तासांत 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 5 लाख 28 हजार 799 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.