ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट वाढत आहे.
देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत असताना आता मात्र कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहे.
8 फेब्रुवारीला होळी आहे. देशभरात होळी सण मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरा करण्यात येईल. मात्र यावेळी कोरोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.
देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचं दिसून येत आहे. मागील आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहेत.
गेल्या 24 तासांत देशात 324 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी कोरोनाबाधितांची संख्या 300 होती, आज हीच रुग्ण संख्या 324 वर पोहोचली आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 791 पर्यंत वाढली आहे.
गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.