देशात कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. भारतातील कोरोना प्रादुर्भावामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे.
आज देशातील कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 275 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
दरम्यान देशातील कोरोना संसर्ग किंचित घटला असला, तरी धोका कायम आहे.
जगभरात चीन, जपान आणि ब्राझीलसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे.
आरोग्य प्रशासनाकडून कोरोना विषाणूकडे दुर्लक्ष न करता काळजी घेण्याचं आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात 275 नवीन रूग्णांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
सक्रिय संसर्गाची संख्या 4,767 वरून 4,672 वर घसरली आहे.
चीनमध्ये सलग चौथ्या दिवशी कोविडच्या रुग्णांची संख्या 40 हजारांवर गेली आहे. राजधानी बीजिंग आणि शांघायसारख्या मोठ्या शहरांमध्येही लोक रस्त्यावर उतरले आहेत.
चीन सरकारच्या शून्य-कोविड धोरणामुळे लॉकडाऊनच्या वारंवार अंमलबजावणीमुळे व्यवसायात नुकसान झालेले लोक आता हे धोरण रद्द करण्याची मागणी करत आहेत.