देशात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव दिवसागणिक कमी होताना दिसत आहे कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे एकूण 3 हजार 614 नवीन रुग्ण आढळले असून 89 जणांचा मृत्यू झाला आहे यानंतर मृतांची एकूण संख्या 5 लाख 15 हजार 803 झाली आहे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 50 हजाराच्या खाली गेली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 3,614 नवीन रुग्ण आढळले आहेत दैनंदिन रुग्णांची ही सुमारे 22 महिन्यांतील सर्वात कमी दैनंदिन रुग्णांची नोंद आहे मागील काही दिवस देशात दररोज पाच हजारपेक्षा कमी कोरोना रुग्ण नोंदवली जात आहेत माहितीनुसार, दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या सलग 30 दिवस एक लाखाच्या खाली आहेत देशात आतापर्यंत 179.13 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.