बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री कतरिना कैफ आज (16 जुलै) तिचा वाढदिवस साजरा करत आहे.



कतरिना आजच्या काळातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे.



कतरिना कैफने अनेक मोठ्या कलाकारांसोबत अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.



बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी कतरिना कैफ मॉडेलिंग करायची.



वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती.



मॉडेलिंगच्या काळात तिला 2003 मध्ये आलेल्या 'बूम' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.



‘बूम’ चित्रपट फ्लॉप झाला. पण, या चित्रपटातील कतरिना कैफच्या बोल्ड स्टाईलने बरीच प्रसिद्धी मिळवली.



'बूम' आपटल्यानंतर कतरिनाने साऊथकडे वळण्याचा निर्णय घेतला. तिने 'मल्लीस्वरी' या तेलगू चित्रपटात काम केले.



यानंतर ती बॉलिवूड चित्रपट 'सरकार'मध्ये दिसली. या चित्रपटात कतरिना कैफची छोटी भूमिका होती.



कतरिनाला अभिनेत्री म्हणून खरी ओळख सलमान खानच्या 'मैंने प्यार क्यूं किया' या चित्रपटातून मिळाली.



Thanks for Reading. UP NEXT

16 जुलै : जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

View next story