आमना शरीफ हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.



अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.



'कहीं तो होगा'मधील कशिश सिन्हाच्या भूमिकेत आमना शरीफला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली. या भूमिकेमुळे ती खूप लोकप्रिय झाली.



अभिनेत्री आमना शरीफचा आज वाढदिवस आहे.



‘कही तो होगा’ या शोमध्ये आमना शरीफ राजीव खंडेलवाल आणि गुरप्रीत सिंहसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.



2007पर्यंत ती या शोचा भाग होती. 'कसौटी जिंदगी की' या शोद्वारे तिने सहा वर्षांनंतर टेलिव्हिजनवर पुनरागमन केले होते.



तिने हिना खानच्या जागी कोमोलिकाची भूमिका साकारली होती.



आमनाने 2013 मध्ये तिचा बॉयफ्रेंड अमित कपूरसोबत लग्न केले. अमित कपूर एक चित्रपट वितरक आणि निर्माता आहे.



मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने लग्नापूर्वी हिंदू धर्म स्वीकारला होता.



2015 मध्ये ती एका मुलाची आई झाली. काही काळापूर्वी ती 'होंगे जुदा ना हम' या शोमध्येही दिसली होती.



Thanks for Reading. UP NEXT

हॅप्पी बर्थडे कतरिना कैफ!

View next story