देशातील कोरोना महामारीच्या संसर्गात सतत चढउतार पाहायला मिळत आहे



एक दिवस आधी नव्या कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट आढळल्यानंतर आज पुन्हा नव्या रुग्णांचा आकडा वाढला आहे



देशात 1 हजार 829 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



त्याआधी 1569 नवीन कोरोना रुग्ण आणि 19 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती



दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे



सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोनारुग्णांची संख्या दोन हजारांच्या खाली आहे



देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15 हजार 647 वर पोहोचली आहे



देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 549 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे



भारतात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 87 हजार 259 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत



देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.75 टक्क्यांवर पोहोचलं आहे