देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,581 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4 कोटी 30 लाख 10 हजार 971 वर पोहोचली आहे देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 23,913 झाली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 33 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमवाला आहेत आतापर्यंत भारतातील एकूण कोरोनामृतांची संख्या 5 लाख 16 हजार 543 झाली आहे देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत सोमवारी दिवसभरात 30 लाख 58 हजार 879 डोस देण्यात आले देशात आतापर्यंत एकुण 181 कोटी 56 लाख 01 हजार 944 डोस कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.