देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या धोक्यात दिलासादायक बातमी समाेर आली आहे
देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली आहे
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6594 नवीन रुग्ण आढळले आहेत
कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट दिसून आली आहे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी दिवसभरात 6594 रुग्ण आढळून आले आहेत
गेल्या 24 तासांत 4035 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार 548 पर्यंत पोहोचली आहे
मंगळवारी दैनंदिन सकारात्मकता दर मागील दिवसाच्या तुलनेत 2.05 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे
गेल्या चार महिन्यांपासून हा दर तीन टक्क्यांहून अधिक होता
गेल्या 24 तासांत 4,035 रुग्ण विषाणूपासून बरे झाले असून, महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 26 लाख 61 हजार 370 इतकी आहे