भारतात कोरोनाच्या स्थितीत चढ-उतार सुरू असल्याचं दिसत आहे. मात्र सध्याची रुग्णसंख्या पाहता भारतातील कोरोनाचा धोका आता बराच कमी झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे केवळ 121 नवीन रुग्ण आढळून आले असून, आता कोरोनाचे एकूण रुग्ण 4 कोटी 46 लाख 80 हजार 045 वर पोहोचले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका दिवसात कोरोना लसीचे 50 हजारांहून अधिक डोस देण्यात आले. आता पर्यंत एकूण लसीकरणाचा आकडा 220.14 कोटी झाला आहे सक्रिय रुग्णांबद्दल बोलायचे झाले तर सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2319 आहे. गेल्या 24 तासात 172 रुग्णांनी कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. सध्या बरे होण्याचे प्रमाण 98.8 टक्के आहे. देशात केवळ 0.01 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. चाचणीही पुन्हा एकदा वाढली आहे. 24 तासांत 1,69,568 चाचण्या केल्यानंतर, आत्तापर्यंत भारतातील एकूण चाचण्यांचा आकडा 91.23 कोटींवर गेला आहे. देशात कोरोनाच्या सकारात्मकता दरातही घट नोंदवली गेली आहे. सध्या, भारतातील दैनिक सकारात्मकता दर 0.07 टक्के आहे सोमवारी (9 जानेवारी) एक दिवस आधी, देशात कोरोनाचे 170 नवीन रुग्ण नोंदवले गेले. तर 24 तासांत 10 हजारांहून अधिक कोरोनाचे डोस देण्यात आले.