आजकाल लोक बॉडीबिल्डिंग आणि फिटनेसकडे लक्ष देत आहेत. यासाठी लोक जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळत आहेत. (Image credit - Unsplash/Pexels)
ABP Majha

आजकाल लोक बॉडीबिल्डिंग आणि फिटनेसकडे लक्ष देत आहेत. यासाठी लोक जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळत आहेत. (Image credit - Unsplash/Pexels)

अशा परिस्थितीत, स्नायू लवकर वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी बरेच लोक उच्च प्रथिनयुक्त आहाराचा अवलंब करतात. (Image credit - Unsplash/Pexels)
ABP Majha

अशा परिस्थितीत, स्नायू लवकर वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी बरेच लोक उच्च प्रथिनयुक्त आहाराचा अवलंब करतात. (Image credit - Unsplash/Pexels)

परंतु जास्त प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्याने त्यांना त्यांचे आरोग्य बिघडवण्याचे परिणाम भोगावे लागू शकतात याची जाणीव बहुतेकांना नसते. (Image credit - Unsplash/Pexels)
ABP Majha

परंतु जास्त प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्याने त्यांना त्यांचे आरोग्य बिघडवण्याचे परिणाम भोगावे लागू शकतात याची जाणीव बहुतेकांना नसते. (Image credit - Unsplash/Pexels)

दररोज किती ग्रॅम प्रथिने घ्यावीत आणि जास्त प्रमाणात घेतल्याने कोणते नुकसान होऊ शकते हे जाणून घेऊया.  (Image credit - Unsplash/Pexels)
ABP Majha

दररोज किती ग्रॅम प्रथिने घ्यावीत आणि जास्त प्रमाणात घेतल्याने कोणते नुकसान होऊ शकते हे जाणून घेऊया. (Image credit - Unsplash/Pexels)

ABP Majha

आपल्या किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो. किडनीला ते अतिरिक्त प्रोटीन देखील फिल्टर करावे लागते. यामुळे त्याच्यावर दबाव येतो आणि त्याला अधिक काम करावे लागते. असेच जास्त काळ चालू राहिल्यास किडनी कमकुवत होते. (Image credit - Unsplash/Pexels)

ABP Majha

अति प्रथिने शरीरात आम्लता वाढवते ज्यामुळे हाडांमधून कॅल्शियम बाहेर पडतो, यामुळे ऑस्टियोपोरोसिस किंवा हाड कमजोर होतात. (Image credit - Unsplash/Pexels)

ABP Majha

अतिरिक्त प्रथिने शरीरात चरबीच्या रूपात जमा होतात आणि वजन वाढू शकते.अशाप्रकारे प्रथिने जास्त प्रमाणात घेतल्यास वजन वाढू शकते आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. (Image credit - Unsplash/Pexels)

ABP Majha

अति प्रथिनांमुळे पोट फुगणे, अतिसार, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. एखाद्याने जास्त प्रथिने घेणे टाळावे. (Image credit - Unsplash/Pexels)

ABP Majha

एक निरोगी व्यक्तीला दररोज त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 0.8 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. उदाहरणार्थ, तुमचे वजन 60 किलो असल्यास, तुम्ही दररोज किमान 48 ग्रॅम (60 x 0.8) प्रथिने खावीत. (Image credit - Unsplash/Pexels)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image credit - Unsplash/Pexels)