मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती.

त्यामुळे तिच्याबद्दल राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते.

पण तूर्तास केतकीला दिलासा मिळाला आहे.

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळे नेहमीच चर्चेत असते.

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी विरोधात राज्यभरात गुन्हे दाखल झाले होते.

त्यानंतर केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने अटक केलेल्या एफआयआरमध्ये जामीन मंजूर केला.

40 दिवसांनंतर केतकीची कारागृहातून सुटका झाली होती.

अशातच आता 21 विविध गुन्ह्यांत 11 जुलैपर्यंत अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे.

त्यामुळे सध्या तरी केतकीला दिलासा मिळाला आहे.

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत 14 मे रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली होती.