डोळ्याच्या साथीच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी पाच घरगुती उपाय जाणून घ्या.



मध हा डोळ्यांचा संसर्ग कमी करण्यासाठी मदतशीर ठरू शकतो. मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. डोळ्यांचा संसर्ग झाल्यास तुम्ही मध वापरु शकता.



एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध घाला. त्यानंतर या मधाच्या पाण्याने डोळे धुवा. डोळ्यातील जळजळ आणि वेदना मधाच्या पाण्याने लवकर दूर होतील.



डोळ्यांच्या फ्लूपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गुलाबजल देखील वापरू शकता. गुलाब पाण्यामध्ये अँटीसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात.



गुलाबपाणी डोळ्यांच्या फ्लूमुळे होणारी समस्या कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो. यासाठी फक्त गुलाब पाण्याचे दोन थेंब डोळ्यात टाका.



डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरू शकतो. बटाट्यामध्ये कूलिंग इफेक्ट असल्याने डोळ्यांच्या संसर्गामुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो.



यासाठी बटाट्याचे गोल काप करून ते डोळ्यांवर ठेवा. बटाट्याचे तुकडे 10-15 मिनिटे डोळ्यांवर राहू द्या.



तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि अँटीऑक्सिडेंट हे उपयोगी गुणधर्म आहेत.



तुळशीची काही पाने पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी यातील तुळशीची पानं गाळून या पाण्याने डोळे धुवा.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.