राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात 'आरएसएस'साठी दसरा हा खास दिवस आहे. या दिवशी दरवर्षी संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपूरमधील रेशीमबागमध्ये विजयादशमी मेळावा भरवला जातो. आरएसएसचे कार्यकर्ते या सोहळ्यात शिस्तबद्धरित्या सहभागी होतात. संघाच्या स्वयंसेवकांकडून पथसंचालनही पार पडतं. नितीन गडकरी संघाच्या पूर्ण गणवेशात... याशिवाय सरसंघचालक यावेळी शस्त्रांची पूजाही करतात. याचं एक खास कारणही आहे. संघाची स्थापना 1925 साली विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशीच झाली होती. स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला आपण घरी करतो त्याप्रमाणे संघाच्या कार्यालयातही शस्रपूजन पार पडतं. संघाचे सरसंघचालक आणि इतर सदस्य शस्रांचं पूजन करतात. 9 दिवसांच्या उपासनेनंतर 10 व्या दिवशी दशमीला विजयाच्या कामनेनं शस्रांचं पूजन केलं जातं.