अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं नवा बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूट समोर आलं आहे. या फोटोंमध्ये चित्रांगदा गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे. मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि रेड लिपस्टिकमध्ये चित्रांगदा सिंह नेहमीप्रमाणे स्टनिंग दिसत आहे. चित्रांगदा सिंह अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे. चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रांगदा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेसच्या बाबतीतही चर्चेत असते. फार कमी लोकांना माहीत आहे की, चित्रांगदा एका मुलाची आई आहे. चित्रांगदाने 2005 साली 'हजारो ख्वाईशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत येण्याआधीच 2001 मध्ये भारतीय गोल्फर ज्योती रंधवासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट घेतला.