सध्या अनेक जण वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी अलिकडच्या काळात अनेक जण चिया सीड्सचा वापर करताना दिसत आहे. चिया सीड्स पौष्टीक असण्यासोबतच वजन कमी करण्यासही खूप फायदेशीर आहेत. चिया सीड्समध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, कॅल्शियम, तांबे, लोह, जस्त आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात. चिया सीड्स फक्त वजन कमी करण्यास मदत करत नाहीत तर ते आरोग्यास देखील फायदेशीर ठरतात. चिया सीड्स साल्व्हिया हिस्पॅनिका वनस्पतीच्या लहान काळ्या बिया असतात. याचा औषधी गुणधर्म आहे. चिया सीड्सचे उत्पादन मुख्यत: अमेरिका आणि चीनमध्ये होते. भारतातही मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी याचे उत्पादन घेतले जाते. चिया सीड्समध्ये कॅल्शियम देखील असते आणि दुधात देखील कॅल्शियम असते, त्यामुळे जर तुम्ही दुधात भिजवलेले चिया बिया खाल्ल्यास तुमची हाडे मजबूत होतात. चिया सीड्स आणि दूध यांचे एकत्रित सेवन केल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. चिया सीड्समध्ये लोह आढळते, जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही चिया सीड्स दुधात भिजवून खाल्ल्यास लोहाची कमतरता दूर होते. चिया सीड्स पाण्यात भिजवून खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. चिया सीड्सच् पाण्यासोबत सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. गॅस, बद्धकोष्ठता या समस्यांपासून सुटका होते. चिया सीड्स पाण्यात भिजवून सेवन केल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते, यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.