छत्रपती शिवाजी महाराजांची 'ती' वाघनखं भारतात येणार छत्रपती शिवरायांनी याच वाघनखांनी अफजल खानाचा वध केलेला अफजल खान अन् छत्रपती शिवरायांच्या भेटीचा तो प्रसंग आजही पोवाड्यांमधून सांगितला जातो आजही अफजल खानाच्या वधाचा घटनाक्रम ऐकून अंगावर शहारे येतात कालांतरानं भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं अन् स्वातंत्र्यानंतर परत जाताना भेट म्हणून वाघनखंही घेऊन गेले महाराजांची हीच वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार करार करणार या महिन्याअखेरीस अल्बर्ट संग्रहालयासोबत MoU वर करार केला जाणार करार करण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला जाणार सर्व काही ठरल्याप्रमाणं घडलं तर, यावर्षीच महाराजांची वाघनखं भारतात परत आणण्यात येतील छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवारही युकेमध्येच आहे. छत्रपती शिवरायांची वाघनखं पुन्हा महाराष्ट्रात येणं ही राज्यासह देशासाठीही अभिमानाची बाब