जम्मू कश्मीरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाले.
ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मिळालं, महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले आहे.
कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशी करण्यात आले.
त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आली होती.
हा पुतळा साडे दहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि 7 बाय 3 या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे.
याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे.
पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे.
अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेनं असावं अशापद्धतीनं पुतळा बसविण्यात आला आहे.
त्यासाठी सुमारे 1800 ट्रक माती टाकून भराव करण्यात आला.
शिवाय याभागातील हवामान, भूस्खलन या बाबी पाहता पक्कं बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.