चांद्रयान-3 पूर्वी चंद्रावर लँड होणार लुना-25; फोटोंमधून पाहा दोघांमध्ये किती असेल अंतर?



चांद्रयान-3 नंतर रशियानं आपलं चंद्रायान अवकाशात पाठवलं आहे. लुना-25 असं या मोहिमेचं नाव आहे.



चांद्रयान-3 नंतर सुमारे एक महिन्यानंतर, मिशन लुना-25 लाँच करण्यात आलं आणि ते प्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं.



रशियाचं मिशन लुना-25 या महिन्यात 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकतं. तर भारताचं चांद्रयान-3 दोन दिवसांनंतर म्हणजेच, 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचणार आहे.



चांद्रयान-3 चे चंद्रावर उतरण्याचं ठिकाण 69.63 दक्षिण, 32.32 पूर्वेला आहे. आणि रशियन लुना-25 मिशनचं स्थान 69.5 दक्षिण 43.5 पूर्वेला आहे.



चांद्रयान-3 आणि लुना-25 मधील अंतर जास्त असणार नाही. त्यामुळे चंद्रावर रशिया आणि भारत एकमेकांचे शेजारी असण्याची शक्यता आहे.



भारत आणि रशिया या दोन्ही देशांचं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील.



शनमुगा सुब्रमण्यन यांनी सांगितलं की, चंद्रावर चांद्रयान-3 आणि लुना-25 मधील अंतर 118 किमी असेल. शनमुगा सुब्रमण्यम हेच व्यक्ती आहेत, ज्यांनी चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरचा ढिगारा अचूकपणे शोधला होता.



चांद्रयान-3 मिशन लुना-25 पेक्षा दूरच्या रस्त्यानं प्रवास करत आहे. याचं एक कारण म्हणजे, रशियन रॉकेट चांद्रयानापेक्षा मोठं आणि अधिक शक्तिशाली आहे. भारताचं रॉकेट लहान आणि कमी खर्चिक आहे.



चांद्रयान-3 चं रॉकेट चंद्राच्या दिशेनं वेगानं जाण्यासाठी इतका वेग देऊ शकत नाही.



दोन्ही मून स्पेसक्राफ्टची लँडिंगची वेळ जवळपास सारखीच आहे. परंतु दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी उतरण्याची योजना आखली आहे.



रशियन एजन्सीनं सांगितलं आहे की, दोघांमध्ये कोणीतीही बाधा येणार नाही. तसेच, चांद्रयान-3 चा लुना-25 ला कोमताही त्रास होणार नाही. तसेच, लुना-25 चा चांद्रयानाला कोणताही त्रास होणार नाही.



दोन्ही मोहिमांमध्ये रोव्हर आणि लँडर आहेत. चांद्रयान-3 चंद्रावर फक्त 14 दिवस काम करेल.



तर Luna-25 चंद्रावर एक वर्ष संशोधन करत राहणार आहे. ते चंद्राच्या मातीचे नमुने गोळा करून त्यांचं विश्लेषण करणार आहे.