पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला आपले परिधान आणि वेशभूषेवरुन कायम चर्चेत असतात. शिवाय त्यांचा फेटाही आकर्षणाचा विषय असतो. जाणून घेऊया 2024 पासून 2023 पर्यंत नरेंद्र मोदींची वेशभूषा कशी होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वातंत्र्यादिनाला लाल किल्ल्यावर पहिल्यांदा ध्वजारोहण केलं. यावर्षी त्यांनी पांढऱ्या रंगाचा खादीचा कुर्ता आणि चुडीदार पायजमा परिधान केला होता. सोबतच त्यांनी भगवा आणि हिरव्या रंगाचा जोधपुरी फेटा बांधला होता.

2015 मध्ये पंतप्रधान मोदी हे क्रीम कलरचा कुर्ता, खादीचे जॅकेट आणि पांढरा चुडीदारमध्ये दिसले होते. तसेच पगडी ही त्यांच्या पेहरावातील आकर्षण होतं. पीएम मोदींनी केशरी बांधणीचा फेटा बांधला होता, त्यावर लाल आणि हिरव्या रंगाचे पट्टे होते.

2016 या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी साधा कुर्ता आणि चुडीदार पायजम्यात दिसले होते. याशिवाय त्यांनी लाल-गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा राजस्थानी फेटा बांधला होता.

2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन चौथ्यांदा स्वातंत्र्यदिनाचं भाषण केलं. होतं. यावेळी त्यांनी हाफ स्लीव्ह्जचा कुर्ता परिधान केला होता. त्यांनी लाल आणि पिवळ्या रंगाची पगडी घातली होती.



2018 मध्ये पंतप्रधान मोदी फुल स्लीव्ह्जच्या कुर्ता पायजामा परिधान केला होता. त्यांनी यावर उपरणं देखील घेतलं होतं. यावर्षी पंतप्रधानांनी केशरी आणि लाल रंगाचा फेटा घातला होता.

2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी हाफ स्लीव्ह्जचा कुर्ता, पायजमा आणि केशरी बॉर्डर असलेलं उपरणं परिधान केलं होत. यावेळी त्यांच्या पगडीचा रंगा खास यास होता. त्यांनी पिवळ्या, लाल आणि हिरव्या रंगाची लहरिया पॅटर्न असलेली पगडी घातली होती.

2020 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी भगवा आणि क्रीम कलरची पगडी परिधान केली होती. त्यांनी हाफ स्लीव्ह्जच्या कुर्त्यासह तो मॅचिंग केला होता. त्यांनी भगवी बॉर्डर असलेल्या पांढरा दुपट्टाही घेतला होता.

2021 मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवालाही पंतप्रधान मोदी खास वेशभूषेत दिसले होते. मोदींनी यावेळी पारंपरिक कुर्ता आणि चुडीदार, निळं जॅकेट आणि स्टोलसह भगवी पगडी घातली होती.

2022 मध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रध्वज असलेली पांढरा फेटा परिधान केला होता. पांढरा कुर्ता आणि निळ्या रंगाच्या जॅकेटसह त्यांनी आपला लूक पूर्ण केला. यामधून सरकारच्या हर घर तिरंगा अभियानाची झलक मिळाली होती.

यंदा म्हणजेच 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास फेटा बांधला होता. यावेळी त्यात पिवळ्या, लाल रंगासह अनेक रंग होते. सोबतच त्यांनी पांढऱ्या कुर्त्यावर काळ्या रंगाचं जॅकेट आणि चुडीदार परिधान केला होता.