भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेकडे लागलं आहे.



चांद्रयान-3 चा चंद्राकडे प्रवास सुरु आहे. चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडलं असून त्याचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे.



चांद्रयान-3 ने सर्व कक्षा ठरलेल्या वेळेत पूर्ण केल्या असून आता ते चंद्राच्या कक्षेत लवकरत प्रवेश करेल. दरम्यान, चांद्रयान-3 साठी पुढील काही तास फार महत्त्वाचे आहेत.



इस्रोने म्हटले आहे की, चांद्रयान-3 मोहीम या आठवड्याच्या सुरुवातीला पृथ्वी सोडल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या प्रभावाच्या क्षेत्रात प्रवेश करेल.



या मोहिमेचं यश सध्या एका गंभीर टप्प्यावर अवलंबून आहे. जर चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करू शकलं नाही तर, ही चंद्रमोहिम अयशस्वी ठरेल.



त्यामुळे सध्या चांद्रयान-3 मोहिम गंभीर टप्प्यावर आहे. चांद्रायान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यावर ही मोहिम सफल होणार आहे.



चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये शिरण्यास चांद्रयान-3 अयशस्वी झाल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.



पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चांद्रयान-3 चंद्रावर कोसळू शकते किंवा त्यापासून दूर फेकले जाऊ शकते. त्यामुळे चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणं फार महत्त्वाचं आहे.



इस्त्रोने सांगितल्याप्रमाणे, चांद्रयान -3 ने पृथ्वीच्या कक्षेतील सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण करत चंद्राच्या दिशेने प्रवास सरु केला आहे.



तसेच जर यामधील सर्व प्रक्रिया या व्यवस्थित पार पडल्या तर चांद्रयान 5 ऑगस्ट 2023 पर्यंत चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणं अपेक्षित आहे.



14 जुलैला चांद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण झालं असून ते 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे.