चंद्रमुखी'तील 'चंद्रा'ने आपल्या ठसकेबाज लावणीने सर्वांना घायाळ केल्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या 'बाई गं...'ही बैठकीची लावणीला अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे.

आर्या आंबेकर हिच्या सुमधूर आवाजाने गाण्याची रंगत वाढवली आहे.

विशेष म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने आर्याने प्रथमच अजय-अतुल सोबत काम केलं आहे.

'लावणीकिंग' म्हणून चर्चेत असणाऱ्या आशिष पाटील यांनी या लावणीचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे.

अमृताच्या नृत्य आणि सौंदर्याने या गाण्याला रंगत आणली आहे. 

प्रेक्षकांनाही हे गाणं नक्की आवडेल असा विश्वास प्रसाद ओकनं व्यक्त केलाय

'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे.

चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद असलेल्या या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.