केंद्र सरकारने इंधन आणि कच्च्या तेलावरील करामध्ये बदल केला आहे.



कच्च्या तेलावरील विंडफॉल करामध्ये किरकोळ वाढ केली आहे.



केंद्र सरकारने शुक्रवारी (3 मार्च) कच्चे तेल आणि इंधनावरील विंडफॉल टॅक्समध्ये बदल केला आहे.



हे नवे करबदलाचे नियम शनिवारी 4 मार्चपासून लागू करण्यात आले आहेत.



आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार विंडफॉल टॅक्समध्ये बदल करण्यात येतो.



केंद्र सरकार दर 15 दिवसांनी विंडफॉल टॅक्सचे नवे दर जारी केले जातात.



केंद्र सरकारने स्थानिक पातळीवर उत्पादित कच्च्या तेलावरील विंडफॉल करात किरकोळ वाढ केली आहे.



सरकारने विंडफॉल टॅक्स 4350 रुपये प्रति टन वरुन 4400 रुपये प्रति टन वाढवत किंचित केली आहे.



दरम्यान डिझेलवरील विंड फॉल टॅक्समध्ये घट करण्यात आली आहे. डिझेलवरील निर्यात शुल्क 0.5 रुपये प्रति लिटर करण्यात आलं आहे.



त्याचबरोबर विमान इंधनावरील निर्यात शुल्क रद्द करण्यात आलं आहे. पेट्रोलवर कोणतंही निर्यातीवर शुल्क लागणार नाही.



केंद्र सरकारने लागू केलेले नवीन दर 4 मार्चपासून लागू करण्यात आले आहेत.