शेअर बाजारात एलआयसीच्या शेअरला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही



शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून एलआयसी शेअर दरात सातत्याने घसरण सुरू आहे



एलआयसी कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून बाजार भांडवलात आतापर्यंत 1.51 लाख कोटींची घट झाली आहे



शुक्रवारी 10 जून रोजी एलआयसीच्या शेअर दराने 708.05 रुपयांचा नीचांकी दर गाठला



एलआयसीच्या शेअर दरात होणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे



या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे



एलआयसीच्या शेअर दरात होत असलेली घसरण तात्पुरती असल्याचे DIPAM चे सचिव तुहिनकांत पांडे यांनी सांगितले

लोकांना एलआयसीचे फंडामेंटल्स समजण्यास वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले



एलआयसी मॅनेजमेंट सर्व पैलूंवर लक्ष देणार असून शेअर धारकांना फायदा होईल असेही त्यांनी म्हटले



कंपनी आपली एम्बेडेड वॅल्यू जून महिन्याच्या अखेरपर्यंत अपडेट करणार असल्याचे त्यांनी सांगितले



Thanks for Reading. UP NEXT

बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा दबदबा

View next story