जगातील अनेक मोठ्या आणि पवित्र नद्या भारतातून वाहतात.



भारतातील नद्यांची एक खास गोष्ट म्हणजे येथील सर्व नद्या एकाच दिशेने वाहतात, मात्र यालाही अपवाद एक नदी आहे.



गंगा नदी ते यमुना नदीपर्यंत कोणत्याही नदीचा प्रवाह पाहिल्यास या नद्या पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे वाहत असल्याचं तुम्हाला दिसेल.



पण भारतात अशी एक नदी आहे जी तिच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहते. जाणून घ्या भारतात अशी कोणती नदी आहे.



देशातील बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्व दिशेला वाहतात आणि बंगालच्या उपसागरात मिळतात.



पण नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहाच्या विरुद्ध वाहते आणि अरबी समुद्राला मिळते.



नर्मदा नदी गुजरात आणि मध्य प्रदेश या भारतातील दोन मोठ्या राज्यांची मुख्य नदी आहे.



यामागे एक मुख्य कारण आहे. नर्मदा नदी विरुद्ध दिशेला वाहण्यामागचं मुख्य कारण म्हणजे रिफ्ट व्हॅली.



रिफ्ट व्हॅली म्हणजे नदी ज्या दिशेने वाहते, तिचा उतार विरुद्ध दिशेला असतो.



या उतारामुळे नर्मदा नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. ही नदी मखल पर्वताच्या अमरकंटकच्या शिखरावरून उगम पावते.



प्रवाहाविरुद्ध वाहणाऱ्या नर्मदा नदीमागे एक पौराणिक कथाही प्रचलित आहे.



या पौराणिक कथेनुसार, नर्मदा नदीचं लग्न सोनभद्रासोबत ठरलं होतं, पण नर्मदेची मैत्रीण जोहिला हिच्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.



याचा राग आल्याने नर्मदेने आयुष्यभर कुमारी राहण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून नर्मदेने प्रवाहाविरुद्ध वाहून जाण्याचा निर्णय घेतला, अशी कथा प्रचलित आहे.



नर्मदा भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे.