निवृत्तीनंतर अनेकांपुढे अनेक आर्थिक अडचणी येतात. पण याच अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून तुम्ही या योजनेत पैसे गुंतवायला हवेत. नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर नियमित उत्पन्नाचा स्त्रोत शिल्लक राहात नाही. त्यामुळे निवृत्तीनंतरचे आयुष्य चांगले आणि आर्थिक चणचणीविना जाण्यासाठी मोठी बचत केलेली असणे गरेजेचे आहे. अशा बचतीसाठी पीपीएफसारख्या योजना मदतीला येतात. पीपीएफ योजनेत पैसे गुंतवून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. पीपीएफ अकाऊंट कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खोलता येते. पीपीएफ खात्यात एकूण 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. तुम्ही जमा केलेल्या पैशांवर सरकार 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज देते. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीचे 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही बचत पाच-पाच वर्षांनी वाढवू शकता.