आजकाल आधार कार्ड प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्त्वाचे आवश्यक कागदपत्र बनले आहे

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: freepik

सरकारी योजनांपासून ते मोबाइल सिम किंवा शाळा प्रवेशापर्यंत कोणत्याही अधिकृत कामासाठी याची आवश्यकता असते

Image Source: freepik

आधार कार्डावर देण्यात आलेला 12 अंकी क्रमांक लाईफटाईम असतो.

Image Source: freepik

पण अनेकदा आधार कार्ड कुठेतरी गहाळ होतं. कधीकधी तर हरवून जातं. तर तुम्ही घरी बसूनही नवं आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

Image Source: freepik

आधार कार्ड हरवल्यास, नवं आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी, सर्वात आधी UIDAI च्या वेबसाइटवर जा.

Image Source: freepik

त्यानंतर My Aadhaar विभागात Retrieve Lost or Forgotten UID/EID वर क्लिक करा.

Image Source: freepik

आता तुम्हाला नाव, जन्मतारीख आणि रजिस्टर केलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल भरून झाल्यावर कॅप्चा कोड टाकायचा आहे.

Image Source: freepik

त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी (OTP) मिळेल, तो सत्यापित करा.

Image Source: freepik

ओटीपीची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला तुमची आधार माहिती स्क्रीनवर दिसेल.

Image Source: freepik

आणि त्याचबरोबर एसएमएस किंवा ईमेलद्वारेही तुम्हाला आधार कार्ड पाठवले जाईल.

Image Source: freepik