सोन्याचा भाव तब्बल 2,365 रुपयांनी घसरला आहे. हा अचानक घडलेला बदल गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

Published by: जगदीश ढोले
Image Source: unsplash

गेल्या 24 तासांत सोन्याचा दर 96,593 रुपयांवरून थेट 94,228 रुपयांवर आला आहे. प्रति तोळ्याच्या दरात सुमारे अडीच हजारांची घसरण झाली आहे.

Image Source: unsplash

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाची भीती आता दूर झाली आहे.या सकारात्मक घडामोडीमुळे बाजारात स्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Image Source: unsplash

अमेरिका आणि चीन यांच्यातील करारामुळे व्यापार युद्ध थांबले आहे.

Image Source: unsplash

अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे डॉलर मजबूत झाला आणि सोन्याच्या किमतीवर नकारात्मक परिणाम झाला.

Image Source: unsplash

22 एप्रिल रोजी सोन्याचा दर ₹1,02,073 इतका होता.त्याच दराशी तुलना केली तर आतापर्यंत तब्बल ₹7,845 ची घसरण झाली आहे.

Image Source: unsplash

सध्या लग्नसराई सुरू असल्याने, ही घसरण सामान्य ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकते.अनेक जण यावेळी सोने खरेदी करण्याची संधी घेउ शकतात.

Image Source: unsplash

सोन्याचा दर आणखी कमी होणार का, याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागून राहिलं आहे.जागतिक घटनांनुसार दरात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.पदहुा

Image Source: unsplash

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: unsplash