इस्त्रायलनं इराणची राजधानी तेहरानवर हल्ले केल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Published by: विनीत वैद्य

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 1 लाख रुपयांवर गेले आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पहिल्यांदा सोन्याच्या दरानं एक लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे.

सोन्यातील गुंतवणूकदारांना यंदा शेअर मार्केट पेक्षा चांगला परतावा मिळाला आहे.

त्यामुळं हे निश्चित झालंय सोन्यातील गुंतवणूक संकटाच्या काळात उपयोगी पडणारी आहे.

चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे.

चांदी देखील 1 लाख 6 हजार रुपयांवर पोहोचली आहे.

इस्त्रायलनं इराणवर हल्ला केल्यानं भू राजकीय तणाव वाढला आहे.



ज्यामुळं गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यातील गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला आहे.

त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली आहे.

क्रूड ऑईलच्या दरात 13 टक्क्यांची तेजी आली आहे