जर आपण अद्याप कर बचतीसाठी कोणतेही आर्थिक नियोजन केले नसेल तर पुढीलप्रमाणे करु शकतात.
पब्लिक प्रोव्हिंडेंट फंड (पीपीएफ) हा दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय आहे.
नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) ही सरकारी सेवानिवृत्तीची बचत योजना आहे. यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत कर सूट देखील आहे.
सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत मुलींसाठी गुंतवणूक करून कर वाचवू शकतात.
सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये केलेल्या गुंतवणूकीद्वारे, खात्यात जमा केलेल्या रकमेवर 80 C अंतर्गत आयकर सूट मिळवू शकतात.
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) म्युच्युअल फंड द्वारे कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.