पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढवण्यासंदर्भातील निर्णय होऊ शकतो.
केंद्र सरकार आज महागाई भत्ता वाढीसंदर्भात घोषणा करु शकते. याचा फायदा केंद्राचे कर्मचारी अन् पेन्शनर्स मिळून 1 कोटी लोकांना फायदा होऊ शकतो.
सरकारकडून दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी महागाई भत्ता रिवाईज केला जातो. त्यानंतर याची घोषणा केली जाते.
मीडिया रिपोर्टनुसार महागाई भत्ता 2 टक्के वाढू शकतो. सध्या महागाई भत्ता 53 टक्के असून वाढून 55 टक्के होऊ शकतो.
कर्मचारी संघटनांकडून डीए 3 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला होता. त्यामुळं तो 50 टक्क्यांवरुन 53 टक्क्यांपर्यंत पोहोचला.
महागाई भत्ता जर 2 टक्क्यांनी वाढला तर ज्याचं मूळ वेतन 18000 जार असेल त्यांच्या पगारात 360 रुपयांची वाढ होईल.
55 टक्क्यांच्या हिशोबानं महागाई भत्ता 9900 रुपये मिळेल. जर तीन टक्के वाढ झाली तर 56 टक्क्यांच्या हिशोबानं महागाई भत्ता 10080 रुपये मिळेल.
महागाई भत्ता ग्राहक मूल्य निर्देशांकांच्या (AICPI) च्या आधारावर निश्चित केला जातो. 2006 मध्ये सरकारनं महागाई भत्ता मोजण्यासाठी नवं पद्धत सुरु केली होती.
याशिवाय केंद्र सरकारचे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा देखील करत आहेत. केंद्रानं याबाबत जानेवारी 2025 मध्ये घोषणा केलेली. तो जानेवारी 2026 पासून लागू होणं अपेक्षित आहे.