डीबीएस बँकेचा नवा नियम: खातेात ₹10,000 नसेल तर ₹500 दंड!

Published by: जयदीप मेढे
Image Source: PEXELS

डीबीएस बँक इंडिया 1 ऑगस्ट 2025 पासून नवे नियम लागू करत आहे. ग्राहकांनी बचत खात्यात किमान ₹10,000 शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे.

Image Source: PEXELS

जर खात्यातील रक्कम ₹10,000 पेक्षा कमी झाली, तर दंड आकारला जाईल. हा दंड 6% किंवा ₹500 पैकी जो अधिक असेल तो असणार आहे.

Image Source: PEXELS

हा नियम डीबीएस बँकेच्या सर्व बचत खात्यांवर लागू होईल. बँकेने ग्राहकांना मेसेजद्वारे ही माहिती दिली आहे.

Image Source: PEXELS

1 ऑगस्ट 2025 पासून हा नवा नियम प्रत्यक्षात येणार आहे. अनावश्यक शुल्क टाळण्यासाठी खाते वेळेवर अपडेट ठेवा.

Image Source: PEXELS

खात्याच्या प्रकारानुसार दंडाची रक्कम वेगळी असणार आहे. वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळी नॉन-मेन्टनन्स फी आहे.

Image Source: PEXELS

डीसीबी बँकेने 1 मे 2025 पासून एटीएम शुल्क वाढवले आहे. या वाढीला रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली होती.

Image Source: PEXELS

मोफत व्यवहारांची मर्यादा पार केल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी ₹23 शुल्क आकारले जाईल. हा नियम फक्त डीसीबी नाही, तर बहुतेक बँकांवर लागू आहे.

Image Source: PEXELS

तुम्ही डीबीएस कार्ड वापरून डीसीबी एटीएममधून पैसे काढल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. डीबीएस कार्डधारक अनेक वेळा विनाशुल्क पैसे काढू शकतात.

Image Source: PEXELS

हे बदल आरबीआयच्या 28 मार्च 2025 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहेत. उद्दिष्ट म्हणजे अति एटीएम वापर आणि बँलन्स ठेव यावर नियंत्रण ठेवणे.

Image Source: PEXELS

ग्राहकांनी त्यांच्या बँकेकडून येणारे मेसेज आणि ईमेल काळजीपूर्वक तपासावेत. यामुळे अनपेक्षित शुल्क टाळता येईल.

Image Source: PEXELS