मग तो गाय असो की बैल... शेतकरी आपल्या पाळलेल्या बैलाला किंवा गाईला जीवापाड प्रेम करत असतो.
याचा प्रत्यय आलाय बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी या गावात... या गावातील पांडुरंग मगर आणि वसंता मगर यांनी त्यांच्या गाईचं चक्क डोहाळे जेवण केलं.
ज्याप्रमाणे समाजात डोहाळे जेवण आणि त्याचे सोपस्कार पार पाडले जाता,त ते सोपस्कार मगर परिवाराने आपल्या गाईवर केले आणि संपूर्ण गावाला डोहाळे जेवण देण्यासाठी आमंत्रित केलं.
परिवारातील आणि गावातील महिलांनी गाईला हार-तुरे घालून पारंपारिक गाणी सुद्धा म्हटली.
त्यामुळे आजही ग्रामीण भागात शेतकरी प्राण्यांवर आपल्या परिवारातील सदस्य इतकंच प्रेम करत असल्याचा संदेश मगर कुटुंबीयांनी दिला आहे.