सोन्या-चांदीच्या दरांना पुन्हा एकदा तेजी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
बुधवारी सोन्याचे दर 800 रुपयांनी तर चांदीचे दर 1500 रुपयांनी वधारले होते.
तर आज गुरुवारी (16 मे)सोने आणि चांदी दोघांच्या दरांत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतीय फ्युचर्स मार्केट वर देण्यात आलेल्या माहितीनुसार,
सोन्याचे दर 113 रुपयांच्या (0.15%) वाढीसह 73,215 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास व्यवहार करतंय.
तर काल (15 मे) सोन्याचे दर 73,102 रुपयांवर बंद झाले होते.
तर चांदी 375 रुपये (0.43%) च्या तेजीसह 87,240 रुपये प्रति किलोग्रामवर व्यवहार करतेय.
बुधवारी चांदीचे दर 86,865 रुपयांवर होते.
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती.
बुधवारी सोन्याचे दर 40 डॉलर्सनी वाढून एक महिन्याच्या उंचीसह 2400 डॉलर्सजवळ पोहोचला होता.
तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात 11 वर्षांनंतर चांदी 30 डॉलरच्या पुढे गेली आहे.
भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये चांदीच्या वायद्यानं 1500 रुपयांची उसळी घेत 86,975 रुपयांचा उच्चांक गाठला,
तर सोन्याचे वायदेही 800 रुपयांनी वाढून 73100 रुपयांच्या जवळ बंद झाले होते.