अंगणात माझ्या झरे धम्मधारा
बघ बोधीवृक्ष लागला फुलाया



हृदयात माझ्या, हसे तथागत
चंद्र येई घरा, चांदणे मागत....!

- डॉ. प्रदीप आवटे



तू ‘ये आणि पहा’, धम्म गौतमाचा
सन्मित्रा निश्चये, नाश हो तमाचा!



नेई जो मनुजा, दुःखाच्या पल्याड
शांती भांडाराचे, उघडे कवाड....!

- डॉ. प्रदीप आवटे



मैत्र ना जाणते, कोणते कुंपण
मैत्र जाणे मात्र, मनांची गुंफण



मैत्र ही सरिता, मित्र हा सविता
मैत्र जगण्याची, सुंदर कविता...

- डॉ. प्रदीप आवटे



तथागत म्हणे, तुला मला त्याला
सन्मित्रा सांभाळी, तुझ्या विवेकाला



विवेक भेदितो, अंधाराचे जाळे
आभाळी देखणी, पहाट उजळे !

- डॉ. प्रदीप आवटे



तुझ्यात माझ्यात,
भेद सांग काय ?

तुझ्यात माझ्यात,
सानथोर काय?



माझ्यापरी तू रे, तुझ्या परी मी ही
तुझ्यात माझ्यात, भेद काही नाही...!

- डॉ. प्रदीप आवटे