अवघ्या काही तासातच मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर दाखल होणार
कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
16 ते 19 मे दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता
कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने यंदाही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती.
पुढच्या दोन दिवसात केरळ आणि लक्षद्वीपमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
केरळात पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल आणि ईशान्यकडील 7 राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पूर्वमोसमी पावसाची शक्यता
कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यात पावसाचा अंदाज