भारत जोडो यात्रेत गांधी कुटुंबियांचे अनेक फोटो पाहायला मिळाले. यात्रेत राहुल गांधींसोबत बहीण प्रियंका याही सहभागी झाल्या आहेत. यात्रा गाझियाबादमध्ये दाखल झाल्यानंतर त्या सहभागी झाल्या. त्यांनी गाझियाबादमध्ये राहुल आणि इतर भारत यात्रेचे स्वागत केले. भारत जोडो यात्रा नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पुन्हा सुरू झाली. यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी स्टेजवर एकत्र बसलेले दिसले. जिथे राहुल गांधी आणि बहीण प्रियांका यांचा निखळ प्रेम दिसलं. हे पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. दरम्यान, उत्तर प्रदेशात ही यात्रा 5 जानेवारीपर्यंत चालणार आहे.