पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत
पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथचे दर्शन घेत रुद्राभिषेक केला.
त्यानंतर त्यांनी केदारनाथमध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला
केदारनाथच्या दर्शनानंतर (Kedarnath) पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी बद्रीनाथकडे प्रयाण केले आहे.
पंतप्रधान मोदी यांचा उत्तराखंड दौरा असला तरी याचा संबंध हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीशी जोडण्यात येत आहे
शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांच्या पेहरावाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले
चंबामधील वेशभूषा आणि हिमाचली टोपीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथचा दौरा हा हिमाचल प्रदेशला केंद्रीत ठेवून केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आज केदारनाथमध्ये दाखल झालेल्या पंतप्रधान मोदींच्या पेहरावाची मोठी चर्चा सुरू झाली.
पंतप्रधान मोदींनी केदारनाथसाठी हिमाचल प्रदेशमधील चंबातील महिलांनी दिलेला पेहराव परिधान केला होता.
त्याशिवाय, त्यांनी हिमाचली टोपी परिधान केली होती. पंतप्रधान मोदी यांनी परिधान केलेल्या पेहरावाला 'चोल डोरा' असं म्हणतात.
हा पोषाख नुकत्याच हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यादरम्यान महिलांनी पंतप्रधानांना भेट म्हणून दिला होता.
पंतप्रधान मोदी यांनी बाबा केदारनाथची विधीवत पूजा करत रुद्राभिषेकदेखील केला.
देवासमोर मोदी नतमस्तक झाले. मंदिरातून बाहेर पडताना नंदी बाबाला श्रद्धापूर्वक नमस्कार केला.