ब्रह्मास्त्र या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटातील VFX ला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. चौथ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सोमवारी (12 सप्टेंबर) म्हणजेच चौथ्या दिवशी ब्रह्मास्त्र या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 16 कोटींची कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटींची कमाई केली. अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ब्रह्मास्त्र चित्रपटाचं कौतुक करत आहेत. काहींना हा चित्रपट आवडला आहे तर काहींची या चित्रपटाला नापसंती मिळाली आहे. ब्रह्मस्त्र चित्रपटातील आलिया आणि रणबीरच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटातील कलाकरांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.