बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी आज (13 सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
महिमा चौधरीचा जन्म 13 सप्टेंबर 1973 रोजी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झाला.
महिमा चौधरीचे खरे नाव रितू चौधरी आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर नाव बदलून ‘महिमा चौधरी’ असे केले.
महिमा चौधरीने डाऊन हिल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लोरेटो कॉलेजमधून पुढील शिक्षण पूर्ण केले.
1990 मध्ये तिने आपले शिक्षण सोडून मॉडेलिंगच्या जगात नशीब आजमावले. मॉडेलिंग करिअरमध्ये तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले.
यानंतर तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
जाहिरात क्षेत्रातून महिमाने मनोरंजन क्षेत्रात पाउल टाकलं. मॉडेलिंग कारकिर्दीत ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली.
अभिनेत्री महिमा चौधरी हिला प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी चित्रपटांमध्ये पहिली संधी दिली होती.
कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटातून महिमा चौधरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटातील महिमा चौधरीचा लूकही समोर आला आहे.