दक्षिणेतील बिंदास अभिनेत्री अमला पॉल तिच्या स्पष्ट मतासाठी ओळखली जाते. अलीकडेच पॉलने एका मुलाखतीत तामिळ इंडस्ट्री का सोडली याचा खुलासा केला आहे. अमला पॉल एका दशकाहून अधिक काळ दक्षिण चित्रपट उद्योगात सक्रिय आहे. पॉलने जवळवास डझनभर चित्रपटांमध्ये काम केले आहे. पॉलने अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे आणि तिच्या मुलाखतीमधील स्फोटामुळे पॉल सध्या चर्चेत आहे. तमिळ, तेलुगु ते कन्नड, मल्याळम अशा चित्रपटांमध्ये पॉलने काम केले आहे. इतर भाषेंच्या तुलनेत पॉलने तेलुगूमध्ये फार कमी चित्रपट केले आहेत. तेलगू इंडस्ट्रीत कमी सक्रिय असण्याचे कारण अमलाने दिले आहे. 2011 ते 2015 या काळात पॉल इंडस्ट्रीत सक्रिय होती. तेलगू इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असताना अमलाने एकूण चार चित्रपटांमध्ये काम केले. पहिला चित्रपट नागा चैतन्यसोबत होता. पॉलने राम चरण, अल्लू अर्जुन यांसारख्या स्टार्ससोबतही काम केले. तेलुगू चित्रपटांमधील नायिका फक्त ग्लॅमर म्हणून सादर केल्या जातात. त्यामुळेच तीने तेलगू इंडस्ट्री सोडल्याचे पॉल सांगते.