बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. रिलीजच्या तिसऱ्याच दिवशी या सिनेमाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात 'ब्रह्मास्त्र' सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाने रिलीजआधीच अनेक रेकॉर्ड केले आहेत. 'ब्रह्मास्त्र'चे अनेक शो हाऊसफुल्ल जात आहेत. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा जगभरात 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. ब्रह्मास्त्र सिनेमाने जगभरात तीन दिवसांत 225 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला 200 कोटींच्या कल्बमध्ये सामील होणारा 'ब्रह्मास्त्र' हा पहिलाच सिनेमा आहे. ब्रह्मास्त्र सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्र सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.