अरिजित सिंह किती कमावतो? रॅपर रफ्तारचा मोठा गौप्यस्फोट

Published by: स्नेहल पावनाक

अरिजित सिंह सध्याचा बॉलिवूडच्या टॉप गायकांपैकी एक असून प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाला त्याचं गाणे चित्रपटात समाविष्ट करण्याची इच्छा असते.

Published by: स्नेहल पावनाक

अरिजित सिंह सध्या स्टारडमच्या शिखरावर आहे. तो चित्रपटांमध्ये गाणी गाण्यासोबतच स्टेज शो आणि कॉन्सर्टही करतो.

Published by: स्नेहल पावनाक

अलिकडेच सिंगर-रॅपर रफ्तार आणि इक्का यांनी अरिजित सिंहच्या कमाईबाबत गौप्यस्फोट केला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

एका पॉडकास्टमध्ये रफ्तारने सांगितलं की, अरिजीत शोमधून इतका पैसा कमावतो की, त्याने मुंबईत आलिशान डुप्लेक्स फ्लॅट विकत घेतला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

अरिजीत सिंहच्या कमाई आकडा तुम्हाला वेडं लावेल, पण त्याचा स्वभाव तितकाच शांत आहे, असं तो म्हणाला.

Published by: स्नेहल पावनाक

रफ्तार पुढे म्हणाला की, लोकांना वाटतं आम्ही श्रीमंत आहोत, कारण आम्ही श्रीमंत दिसतो. पण, अरिजीत सिंहने आमच्यासारखे 100 जण लंचमध्ये खाल्ले आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

यावेळी रफ्तारने एक किस्सा सांगितला की, अरिजीत शो संपवून बाहेर आला, त्यावेळी त्याची गाडी पोहोचायला वेळ लागत होता. तेव्हा त्याच्या समोर उभ्या असलेल्या रिक्षामध्ये बसून तो घरी निघून गेला.

Published by: स्नेहल पावनाक

रफ्तार म्हणाला की, अरिजीतला लग्न सोहळ्यात गायला आवडत नाही, कुणीतरी त्याला गाण्यासाठी हट्ट केला आणि त्याने बदल्यात मुंबईत डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला.

Published by: स्नेहल पावनाक

तो म्हणाला की, मुंबईत डुप्लेक्स फ्लॅटची जेवढी किंमत आहे, तेवढी फी अरिजित सिंहला दीड तास गाण्यासाठी मिळते.

Published by: स्नेहल पावनाक

रफ्तारने अरिजित सिंह आणि एआर रेहमान यांची तुलना केली. यावेळी तो म्हणाला की, एआर रेहमान सर लाईव्ह शोचे 3 कोटी रुपये घेतात, तुम्ही अरिजित सिंहच्या लाईव्ह शोची फी पाहा.

Published by: स्नेहल पावनाक

रफ्तार म्हणाला, प्रत्येकाचा एक काळ असतो, पण तो याचा कुठेही गाजावाजा करत नाही.

Published by: स्नेहल पावनाक

अरिजीत सिंहने हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

Published by: स्नेहल पावनाक