तिच्या फिटनेसमुळे तिला बॉलीवूड क्वीन म्हणतात,ती म्हणजे शिल्पा शेट्टी..
फिट राहण्यासाठी शिल्पा हेल्दी डाएट घेते.
तसेच योगासने, नृत्य आणि व्यायामाला नित्यक्रमाचा भाग बनवते.
या अभिनेत्रीने मुलाखती दरम्यान तिच्या फिटनेस फंडाबद्दल अनेकदा बोलले आहे. ती सोशल मीडियावर योग आणि व्यायामाचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते.
सुट्टीतही ती योगा सोडत नाही. शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 2 योगासनांचा व्हिडीओ शेअर केला होता.
एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार योग तज्ज्ञ नताशा कपूर यांनी योगा करण्याचे फायदे आणि योगा करण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे.
शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस विषयी बोलताना सांगते की, वीरभद्रासन आणि स्कंदासन एकत्र केल्याने अधिक फायदा होतो,
हे मांडीच्या मूळ स्नायूंना ताकद देतात. याव्यतिरिक्त, ते पचनशक्ती, संतुलन सुधारते, तसेच हिप आणि पेल्विक भागाची लवचिकता सुधारते.