शाहरुख खानचं 'किंग' सर्वात श्रीमंत अभिनेता, कोट्यवधींची संपत्ती; यादीत जुही चावलानं ऋतिक रोशनला टाकलं मागे
शाहरुख खान बनला सर्वात श्रीमंत अभिनेता, एका वर्षात 1000 कोटींनी वाढली संपत्ती; नेटवर्थ जाणून घ्या
अभिनेता शाहरुख खान भारतातीत सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
एका वर्षात शाहरुख खानच्या संपत्तीमध्ये 1000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
हुरुन इंडिया श्रीमंतांच्या यादीमध्ये शाहरुख खान सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे.
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार, बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सर्वाधिक श्रीमंत स्टार बनला आहे.
शाहरुख खान प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि क्रिकेट टीम केकेआरचा मालक असून त्यातून तो कोट्यवधींची कमाई करतो.
शाहरुख खान त्याच्या चित्रपटांसाठी मोठी फी आकारतो. त्यामुळे त्याची एकूण संपत्ती 7300 कोटींवर पोहोचली आहे.
लाइफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे 150-250 कोटी रुपये मानधन घेतो.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'पठान' चित्रपटासाठी शाहरुख खानने फी घेतली नव्हती. त्याऐवजी त्याने चित्रपटाट्या नफ्यातील 60 टक्के म्हणजे 200 कोटी रुपये घेतले.
शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान मिळून एक यशस्वी प्रॉडक्शन हाऊस चालवतात. 2002 मध्ये सुरू झालेल्या या प्रोडक्शन हाऊसचे नाव रेड चिलीज एंटरटेनमेंट आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान या प्रोडक्शन हाऊसमधून दरवर्षी 500 कोटी रुपये कमावतो.