सलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे

Published by: विनीत वैद्य

सलमान खानचा 'सिकंदर' यंदाच्या वर्षातल्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे.

या पॉलिटिकल अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला

यासोबतच 'सिकंदर'ची चर्चाही शिगेला पोहोचली आहे.

‘टायगर ३’ नंतर जवळपास दीड वर्षांनी बॉलीवूडचा भाईजान या सिनेमाच्या

निमित्ताने रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

यामुळे सर्व चाहत्यांच्या मनात या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. मात्र,

सलमान खानचा सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे.

थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच ‘सिकंदर’ लीक झाल्याने या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.